Sunday 19 August 2012

मनु व मन्वंतर

मी दिलेल्या वंशावळी या सगळ्या वैवस्वत मनु पासून सुरु होतात. वैवस्वत मनु हा ७वा मनु होता. त्याआधी झालेले सहा मनु म्हणजे स्वायंभुव,स्वारोचिष,उत्तम,तामस,रेवत आणि चाक्षुष.
पुराणांनी दिलेल्या माहितीनुसार गेले, तर सर्वात प्राचीन व्यक्ती जिचा उल्लेख येतो ती आहे पहिला मनु- स्वायंभुव.त्या आधी कोण होते हे पुराणांना माहित नाही, कदाचित स्वायंभुव मनु नंतर इतिहास संवर्धन चे महत्व कळले असावे म्हणून स्वायंभुव पासून ऐतिहासिक माहिती जतन करण्यास सुरुवात केली गेली असावी.
एका मनूच्या राज्यकाल हा ७१ महायुग असतो असे म्हटले जाते. एका महायुगात ४ युगे येतात ज्यांची नावे सतयुग,त्रेतायुग,द्वापरयुग आणि कलियुग ज्यांच्या वर्षांची संख्या एकत्रित ४३२०००० वर्षे इतकी येते. पण हि संख्या खूप मोठी आहे व हे ब्रह्मांड किती प्राचीन आहे हे सांगायला केलेली एक प्रणाली आहे. युग प्रणाली हि काळाच्या मोजमापासाठी बनवली गेली आहे. महाभारत (६.१०) मध्ये संजय सांगतो आधी एक महायुग फक्त १०००० वर्षांचे असायचे. त्यात २००० वर्षांचा संधिकाल जोडून ते १२००० वर्षांचे झाले असे मार्कंडेय महाभारत (३.१८७) मध्ये सांगतो. 
पण त्यानंतर हि १२००० वर्षे मानवी वर्षे नसून दिव्य वर्षे आहेत असे मानले गेले.
१ दिव्य वर्ष= ३६० मानवी वर्षे
त्यामुळे या १२००० वर्षांना मानवी करायला ३६० नि गुणण्यात आले ज्यावरून ४३२०००० हि संख्या आली.
म्हणजे खरं बघितलं तर एक महायुग हे फक्त १०००० वर्षांचेच आहे.
पण या युग प्रणाली मागचे गणित सुद्धा बघा. सतयुग,त्रेतायुग,द्वापरयुग आणि कलियुग यांची अनुक्रमे वर्षे ४:३:२:१ या ratio मध्ये येतात. म्हणजेच ४०००,३०००,२०००,१००० अनुक्रमे.
मन्वंतर या विषयावर परत येऊ. मला असे वाटते कि एक मन्वंतर चा काळ आहे तो काळ त्या मनुने किती काल राज्य केले यावरून ठरत असे व ७१ महायुगांच्या त्याच्याशी काही संबंध नाही. कारण मनुष्य तेवढा काल जगूच शकत नाही. त्यामुळे एक मन्वंतर हे तो मनु किती वर्ष जगला अथवा राज्य केले यावर ठरत असावे.
एका मन्वंतर ची विशेष लक्षणे असतात कि प्रत्येक मन्वंतरात १ इंद्र, देवगण, ७ सप्तर्षी, मनुपुत्र ई हे लोक मनुबरोबर त्याला शासन करायला मदत करतात.

वैवस्वत मनूच्या पूर्वजांविषयी बोलायचे तर त्याचे पूर्वज होते पुढीलप्रमाणे-
ब्रह्म-->मरीची-->कश्यप-->विवस्वान-->वैवस्वत मनु 

पुराणांच्या मते वैवस्वत मनु द्रविड देशावर राज्य करायचा व त्याची राजधानी होती कांचीपुर. 
मत्स्यावतार च्या वेळी झालेल्या महापुरातून तो बचावला व त्याने उत्तरेला जाऊन अयोध्या नागरी शरयू नदीच्या काठी वसवली. आता मत्स्यावतार झाला का नाही, पूर आला का नाही यापेक्षा मनु द्रविड देशातून उत्तरेकडे गेला हि माहिती महत्वाची आहे. तिकडे मनु पासून बरीच घराणी उत्पन्न झाली. त्यांना सुर्यवंश म्हणत.
त्याच वेळी सरस्वती च्या काठी प्रतिष्ठानपूर इथे चंद्र हा राजा राज्य करत होता. त्याचा मुलगा बुध. या बुधाने वैवस्वत मनु च्या मुलीशी, इलाशी, विवाह केला आणि त्यांच्यापासून चंद्रवंश सुरु झाला. 
अशा प्रकारे आपल्या इतिहासातील दोन मुख्य घराणी सुरु झाली.

No comments:

Post a Comment