Sunday 19 August 2012

राजघराणी

मी माझ्या वंशावळी मध्ये प्रमुख राजघराणी घेतली आहेत. हि राजघराणी सुर्यवंश व चंद्रवंश अशी विभागली आहेत.

सुर्यवंशात इक्ष्वाकू,विदेह,वैशाली,ई घराणी येतात. हा सुर्यवंश वैवस्वत मनु पासून उत्पन्न झाला. मनूचा अजून एक मुलगा होता- शर्याती,ज्यापासून आनर्त (गुजरात) देशाचे राजघराणे उत्पन्न झाले. पण ते राजघराणे मी नाही घेतले.
चंद्रवंश मध्ये पौरव, यादव,तुर्वासू,द्रुह्यु,अनु, उत्तर व दक्षिण पांचाल,काशी,ई राजघराणी येतात.
हि सोडल्यास अजून बरीच घराणी आहेत पण पुराण त्यांची माहिती देत नाहीत, कदाचित त्या त्या राजांची नावे माहित नसल्याने पुराण यावर काहीच बोलत नाहीत. अजून म्हणजे अनेक राजांच्या व ऋषींच्या कथा आहेत त्यात बर्याच अनाकलनीय गोष्टी आहेत. पण एक लक्षात ठेवले पाहिजे कि पुराण हे मौखिक रूपाने पुढे जात होते आणि पुराणिक लोक दरबारात किंवा सभा जिंकायला या कथा रंगवून सांगत, म्हणून ज्या अनाकलनीय गोष्टी येतात, त्या आपण दूर ठेवू.  त्याच बरोबर शैव आणि वैष्णव यांच्यातले बौद्धिक वैर असल्याने बऱ्याच कथांना शंकर, विष्णू,देवी, सूर्य,ई देवतांबरोबर जोडण्यात आले. 
कितीही चीड येत असली तरी हेच सत्य आहे कि बऱ्याच घराण्यांबद्दल पुराण माहिती देत नाहीत. पण आपण पुराणकारांना धन्यवाद म्हटले पाहिजे कारण ते थोड्या तरी घराण्यांची माहिती देतात, ती कितीही तुटकी असो, कितीही मिथकांनी भरलेली असो, निदान तेवढी तरी माहिती आपल्याकडे आहे. आणि ते पण ,हि माहिती कुठेही न लिहिता पिढ्या न पिढ्या मौखिक रुपात आपल्याकडे आली आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे.
पुराण ज्या घराण्यांबद्दल जास्त माहिती देत नाहीत ती आहेत- सिंधू-सौवीर, अंग, वंग,कलिंग,विदर्भ,चेदी,गांधार,मत्स्य,केकय,मद्रा,शिवी,ई.
मध्ये मध्ये या घराण्यांच्या राजांची नावे येतात पण त्याचा काहीच उपयोग नाही कारण वंशावळीत ते राजे कुठल्या काळात होते हेच आपल्याला माहित नाही. त्यावर ज्या घराण्यांच्या राजांची नावे आपल्याकडे आहेत त्यात सुद्धा काही नावे गायब आहेत. उदा- पौरव घराणे- त्यात निदान ४० नावे गायब आहेत. त्यामुळे त्या जागी '?' टाकणे भाग आहे.
पण काहीच नसण्यापेक्षा थोडे असलेले कधीही बरं.
पुराण आणि इतिहास ग्रंथ नसते तर आपण आपल्याच इतिहासाबाबत किती आंधळे असतो याचा विचार करा. ते नसते तर खरच आपण विश्वास ठेवला असता कि आपला इतिहास हा हडप्पा संस्कृतीपासून सुरु झाला, आपले ग्रंथ १ल्या सहस्त्रक BC मध्ये लिहिले गेले आणि खरच कोणीतरी आर्य आपल्या देशावर धावून आले. एका पोकळ आर्य सिद्धांतावर विश्वास ठेऊन आपण खूप गमावले आहे. आता आपल्या देशाचा खरा इतिहास बाहेर आणायलाच हवा..
तेच करायचा माझा हा छोटा प्रयास.

No comments:

Post a Comment